Rohit Pawar | मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केले आदित्य ठाकरेंवर आरोप; खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपाला रोहित पवारांचे उत्तर

0
366
Rohit Pawar | keeping politics in front of aditya thackerays allegations said rohit pawar
file photo

नागपूर : Rohit Pawar | रिया चक्रवर्ती प्रकरणावरून खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू या नावाने 44 फोन आले होते, असा दावा शेवाळे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा बाहेर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावर भाष्य केले. राहुल शेवाळे संसदेत कधीच बोलत नाहीत. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

राहुल शेवाळे यांनी मुंबईच्या विकासावर बोलणे अपेक्षित होते. पण ते न करता त्यांनी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बिहारी लोकांची मते जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी हे गणित मांडले आहे. भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागली आहे. त्यामुळे ते असा खोटा आरोप करत आहेत. यापूर्वी देखील बिहार निवडणुकीच्या वेळी सुशांत सिंहचा मुद्दा बाहेर काढण्यात आला होता. गुजरात निवडणुका आल्यावर महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्यात आले. कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर आता सीमावादाचा प्रश्न तापवला गेला आहे आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंवर आरोप केले गेले आहेत, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर संसदेत आरोप केले. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू या नावाने 44
फोन करण्यात आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी स्पष्ट केले आहे, असे शेवाळे संसदेत म्हणाले.

Web Title :- Rohit Pawar | keeping politics in front of aditya thackerays allegations said rohit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Rahul Shewale | ‘राहुल शेवाळे एका महिलेला परदेशात घेऊन गेले होते तेव्हा…’ ठाकरे गटाच्या नेत्याकडून मोठा गौप्यस्फोट

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे