Rohit Pawar | रोहित पवारांनी सांगितले दसरा मेळाव्याच्या चढाओढीत कोण जिंकलं, म्हणाले – ‘शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य’

मुंबई : Rohit Pawar | काल शिवतीर्थावर (Shivtirtha) शिवसेनेचा (Shivsena) पारंपारिक दसरा मेळावा (Dasra Melava 2022) पार पडला तर, बीकेसीवर बंडखोर शिंदे गटाचा (Shinde Group) मेळावा झाला. या दोन्ही मेळाव्यात शिवसेनेचा पारंपारिक मेळावा हा उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आक्रमक भाषण आणि जमलेले हजारो निष्ठावंत शिवसैनिक (Shiv Sainik) यामुळे उजवा ठरल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दसरा मेळाव्याच्या या चढाओढीत कोण सरस ठरले हे सांगितले आहेत. त्यांनी शिंदे गटाला टोला लगावताना म्हटले की, शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य राहीला.

रोहित पवार म्हणाले, कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसे स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झाले.

रोहित पवार (Rohit Pawar) पुढ म्हणाले, मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते, जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो, याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.

कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भाजप (BJP), अमित शहांवर (Amit Shah) पुन्हा तोफ डागली.
पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक
खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का.
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री, अशी खिल्ली ठाकरेंनी उडवली.

Web Title :- Rohit Pawar | loyalty won at last the citadel of bombay impregnable rohit pawars special tweet for thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा