Rohit Pawar | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टिका करणार्‍या भाजप नेत्यांना आमदार रोहित पवार यांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित न राहता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना हजर राहण्यास सांगितले होते. यावरुन मुख्यमंत्र्यांवर भाजप नेत्यांनी चांगलीच टिका केली होती. भाजपमध्ये मंत्र्यांना निर्णय स्वातंत्र्य नसल्याचे सांगत त्यांच्या मर्मावर बोट ठेवत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.

 

त्यात रोहित पवार म्हणतात, मंत्र्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण प्रंतप्रधानांच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका करणार्‍या या नेत्यांनी हे केंद्राचे नाही तर महाराष्ट्राचे सरकार आहे, हे लक्षात घ्यावे. अशा शब्दात रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीला उपस्थित न राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसर्‍या दिवशी मुंबई महापालिकेच्या (BMC) एका कार्यक्रमाला मात्र, ऑनलाइन उपस्थित होते. यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे (Mumbai) अशी उपरोधिक टीका आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली होती.

 

Web Title :- Rohit Pawar | MLA Rohit Pawar gave answer to BJP leaders criticizing Chief Minister Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा