Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) या वर्षीच्या जून महिन्यात फुटली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. महाविकास आघाडी आणि एकंदर सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) शिवसेना फोडल्याचे आरोप केले. त्यानंतर भाजपचे पुढील लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते. त्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विस्तृतपणे भाष्य करत भाजपला सुनावले आहे.

शिवसेना सरकारमधील आणि राज्यातील मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळे दबाव आणून आणि राजकारण करुन तो फोडण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर असू शकतो, असे मी बोललो होतो. कारण शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील दुसरा मोठा पक्ष आहे असे रोहित पवार (Rohit Pawar) एका वृत्तवाहिनीसोबत बोलले.

भाजपचे पुढील लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे शक्य नाही.
कारण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व एक आहोत.
आम्ही एकत्र चालत आहोत आणि एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी भाजपला यश मिळणार नाही. ज्यांना लोकशाही माहीत नाही, दडपशाही माहीत आहे, फोडाफोडी माहीत आहे, त्यांचा पुढील निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस असू शकेल, असे रोहीत पवार म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशात एक भाषण केले होते.
यावेळी त्यांनी देशात भाजप (BJP) हा एकमेव पक्ष राहील, असे म्हंटले होते.
इतर सर्व लहान मोठे पक्ष आम्ही संपविणार आहोत, असे देखील ते म्हणाले होते.
त्यामुळे भाजपवर देशातील सर्व विरोधी पक्ष, बहुपक्षीय लोकशाही संपविण्याचे आरोप करत आहेत.
मात्र शिवसेना फोडीत आमचा हात नाही, असे भाजपने जाहीर केले आहे.

Web Title :-  Rohit Pawar | mla rohit pawar says difficult for bjp to break ncp like shivsena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

Pune Crime | समर्थ आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई