Rohit Pawar | रोहित पवार ED च्या रडारवर?, ‘या’ प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून वारंवार राज्य सरकार, भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) निशाणा साधत आहेत. ते सध्या राज्यातील घडामोडींवर रोखठोक वक्तव्य करताना पहायला मिळत आहे. याच दरम्यान रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मागे ईडीचा (ED) ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार (Rohit Pawar) संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीच्या (Green Acre Company) प्राथमिक चौकशीचे आदेश ईडीने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा. लि. (Green Acre Resort & Retailers Pvt. Ltd.) या कंपनीमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) हे सन 2006 ते 2012 पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेंद्र पवार (Rajendra Pawar) हे देखील या कंपनीत सन 2006 ते 2009 या कालावधीत संचालक होते. तसेच, या कंपनीशी येस बँक (Yes Bank) – डिएचएफएल घोटाळा प्रकरणी (DHFL Scam Case) सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) व सारंग वाधवान (Sarang Wadhawan) यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे समजते. परंतु वाधवान बंधूंचे नाव दोन्ही बँक घोटाळा प्रकरणात आल्यानंतर रोहित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला मिळाली असून या तक्रारीवरुन ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

ग्रीन एकर्स प्रा. लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते.
या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली, तसेच देशात आली.
याची चौकशी व्हावी अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीवरुन प्राथमिक तपास सुरु झाला आहे.
कंपनीने कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.

 

Web Title :- Rohit Pawar | ncp chief sharad pawar grandson mla rohit pawar on ed radar over preliminary inquiry of green acres company

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

 

Pune Crime | 8 महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक