Rohit Pawar | बागेश्वर बाबाच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांनी घेतला सत्ताधाऱ्यांचा समाचार; म्हणाले…

0
748
Rohit Pawar | ncp mla rohit pawar criticizes bageshwar dhams controversial statement about sant tukaram maharaj
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | सतत वादग्रस्त वक्तव्याच्या माध्यमातून वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्यावर एका जाहीर व्याख्यानात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त करत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

सध्या सोशल मिडीयावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हि़डिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. असा खळबळजनक दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून करण्यात आला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!’

 

तर बागेश्वर महाराजांच्या या वक्तव्यावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी देखील निषेध नोंदविला. आचार्य तुषार भोसले म्हणाले, ‘बागेश्वर धाम तथा पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम महाराज (Saint Tukaram) आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी.’

जाणून घ्या नक्की काय म्हणाले होते बागेश्वर बाबा :
बागेश्वर बाबा आपल्या वक्तव्यात म्हणाले होते की, ‘संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती.
कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली.
यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती,
तर मी देवावर प्रेम केलं नसतं, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की,
माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा.’ असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते.

 

Web Title :- Rohit Pawar | ncp mla rohit pawar criticizes bageshwar dhams controversial statement about sant tukaram maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR