Rohit Pawar | ‘काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल पण…’; पवारांचा भाजप, मनसेवर निशाणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसेने (MNS) मशिदीवरील भोंगे (Loudspeakers) खाली उतरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या दोन्ही सभांमध्ये काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका केली मात्र भाजपबाबत (BJP) त्यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. याच सर्व परिस्थितीचं तुलनात्मक वर्णन करताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे.

 

मागील वर्षी सर्व धार्मिक स्थळे (Religious Places) बंद होती आणि त्या काळात आपण जात धर्म विसरून एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन (Oxygen), बेड यासाठी हातात हात घालून आपण लढलो होतो तेव्हा माणुसकी जिंकली आणि त्या संकटाला आपण माघारी धाडलं होतं मात्र आज पुन्हा जातीय आणि धार्मिक वाद निर्माण केले जात असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

कुणाला वाटत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ (Lotus) फुलेल,
काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल,
पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही,
असं तुलनात्मक वर्णन करत रोहित पवार यांनी भाजप आणि मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

 

दरम्यान, फक्त मनात सत्तेचं मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही पवारांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Rohit pawar | ncp mla rohit pawar indirectly criticize bjp and raj thackeray over horn on mosque issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा