Rohit Pawar | … म्हणून फडणवीसांकडून भीतीपोटी CBI चौकशीची मागणी – रोहित पवार

0
155
Rohit Pawar | NCP MLA rohit pawar on devendra fadnavis demanded tet paper leak case cbi inquiry
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेपर फुटी प्रकरणी (TET Paper Leak Case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरातून कोट्यावधींचे घबाड सापडत आहे. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीबीआय चौकशीची (CBI Inquiry) मागणी केली. पण या प्रकरणाचे धागेदोरे हे भाजपच्या (BJP) मोठ्या नेत्यांपर्यंत जात आहे. त्या भीतीपोटी त्यांनी अशी मागणी केली असावी, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पेपर फुटी प्रकरण आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्या आरोपांना उत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले, पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरु आहे. राज्य सरकार (State Government) खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Case) तपास सीबीआयकडे गेला आहे, त्यापूर्वी दाभोळकर प्रकरणाचा (Dabholkar Case) तपास देखील सीबीआयकडे गेला आहे. पण त्याचं काय झालंय? असा सवाल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

याशिवाय महापोर्टल घोटाळा (Mahaportal Scam) भाजपच्या काळात झाला होता. तो घोटाळा उघडकीस आहेच पण आताही टीईटी घोटाळ्याचे (TET Scam) सर्व धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित फडणवीस हे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत असावेत, जेणेकरुन केंद्राचा चौकशीवर कंट्रोल राहील, असा टोला पवार यांनी लगावला.

पडळकर यांना प्रत्युत्तर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असे सांगत व्हिडिओ शेअर करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले, नोव्हेंबर महिन्यातला हा व्हिडिओ आहे. तो 26 डिसेंबर रोजी समोर आणला आहे. असा हल्ला असेल तर त्याचा निषेधच आहे. पण लोकांचा रोष का होता?
व्यक्तिगत चुकीचे वाटते. या घटनेचं राजकीय भांडवल होत असेल आणि
एवढ्या दिवसांनंतर व्हिडिओ समोर आणून असं करत असेल तर चुकीचे आहे.
कोणत्याही आमदाराला सुरक्षा मिळते त्यांनी घेतली नाही हा त्यांचा व्यक्तीगत
निर्णय असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title :- Rohit Pawar | NCP MLA rohit pawar on devendra fadnavis demanded tet paper leak case cbi inquiry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aadhaar Card | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल तुमचे आधार कार्ड, जाणून घ्या काय आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार

Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी

WhatsApp वर मिळेल जवळच्या स्टोअर आणि रेस्टॉरंटची माहिती, जाणून घ्या नवीन फीचर

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू