Rohit Pawar | अभिनेता किरण माने यांना रोहित पवारांचा पाठिंबा; जाणून घ्या नेमकी मानेंनी कोणती घेतलीय भुमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत विलास पाटील (Vilas Patil) ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र, आता किरण माने यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं पुढे आलं आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच (Political Roles) मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे. माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील प्रतिक्रीया देताना किरण माने यांना पाठिंबा दिला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom) ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल. केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म (Constitutional Religion) आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारी नाही, असे ट्विट करत रोहित पवार यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे.

हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद

काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी ट्विटरवरुन किरण मानेंना मालिकेतून काढल्याचा निषेध करत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सावंत म्हणतात की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद (Cultural Terrorism) आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

 

Web Title : Rohit Pawar | NCP MLA rohit pawars support actor kiran mane dropped out serial star pravah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात