Rohit Pawar | रोहित पवारांकडून पंजाब सरकारच्या माजी मंत्री, आमदारांच्या सुरक्षेबाबतच्या निर्णयाचे स्वागत, महाराष्ट्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab CM) होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सर्व माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा (Security) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माजी मंत्री – आमदारांची सुरक्षा काढावी अशी मागणी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन पंजाब सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची
राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे, पोलीस ठाणे (Police Station) ओस पडले आहेत. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते, असे म्हणत भगवंत मान यांनी माजी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल, तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्याबाबत विचार व्हावा.

 

या नेत्यांची सुरक्षा गेली ?
पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांच्या पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल,
भारतभूषण आशू, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल,
धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन अशा एकूण 122 नेत्यांची सुरक्षा काढली जाणार आहे.
मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, ती तशीच कायम राहणार आहे.

 

Web Title :- Rohit Pawar | no security to former ministers and mlas in punjab ncp mla rohit pawar says maharashtra government should think about it

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा