Rohit Pawar On Ajit Pawar Group | आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Ajit Pawar Group | राष्ट्रवादीतील शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) आणि अजित पवार गट यांच्यामधील राजकीय लढाई जोर धरू लागली आहे. शरद पवार गटातील एक खासदार व एक आमदार यांनी अजित पवार गटाची साथ देत प्रतिज्ञापत्र दिले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार व खासदारांवर दबावतंत्र वापरुन काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग (Blackmailing) सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी अजित पवार गटावर केला आहे. तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम होणार नाही असं कदाचित सांगितलं जात आहे असा खुलासा देखील रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार गटातील आमदार व खासदार अजित पवार गटामध्ये (Rohit Pawar On Ajit Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत सत्ताधारी राष्ट्रवादी गटावर टीकास्त्र सोडले आहे.

अजित पवार गटाने विधीमंडळातील अध्यक्षांकडे शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका दाखल केली आहे. यावर रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, “काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर हे करण्यात आलं असेल. त्यांची ती रणनिती असेल आम्ही कारवाई करत आहोत. हा लढा कोर्टात जाईल आणि विजय आमचा होणार आहे.” असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar Group)

धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा राज्यामध्ये केंद्रस्थानी आला असून यावर देखील रोहित पवारांनी राज्य सरकार (State Government) व केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, “केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार मराठा (Maratha Reservation), धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही. हे केवळ शाब्दिक खेळ करणारे सरकार आहे. या सरकारच असं आहे की बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. नंतर वेळखाऊपणा करायचा. आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात सुटणार नाही त्यासाठी केंद्रात जाणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस कोट्याला जशी घटना दुरुस्ती केली तशीच घटना दुरुस्ती गरजेची आहे. भाजपला हे आरक्षण नको आहे असं चित्र आहे. 2014 साली फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार मात्र अजून काही केलं नाही.” अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी आरक्षणाबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच त्यांनी महिला आरक्षणावरुन देखील सरकारला टोला लगावला आहे.
डाग पुसण्याचे काम भाजपा करत असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी महिला आरक्षणाचे (Women’s Reservation) विधेयक मंजूर झाल्याबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, “मणिपूरमध्ये घटना घडली त्यानंतर महिला पैलवान अनेक दिवस आंदोलन करत होते.
हे डाग पुसण्याचे काम भाजप करत आहे. त्यांना आरक्षण आणायचं नाही.
त्यांना खरंच आरक्षण द्यायचे होते तर 2024 साली द्यायला हवे होते.
जे होणार नव्हतं त्यासाठी अधिवेशन घेऊन एवढा गाजावाजा कशाला केला?” अशा कडक शब्दांमध्ये रोहित पावर यांनी
राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar On BJP Devendra Fadnavis | MPSC पेपर फोडणाऱ्यांची नावं गुणवत्ता यादीत, रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Shivsena Ramdas Kadam On Thackeray Group | ’16 आमदारांची तिरडी बांधली’ संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘स्मशानात जायला…’