Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांची अजितदादांवर पुन्हा टीका, भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Ajit Pawar | बारामतीत (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत आहे. या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या एकदम शांत असून त्यांच्यावतीने अजित पवारांचा आक्रमक प्रचार सुरू आहे. अजित पवार विरूद्ध शरद पवार, अजित पवार विरूद्ध रोहित पवार अशी टीका-टीपण्णी सुरू आहे. रोहित पवार हे अजित पवार यांच्यावर सातत्याने बोचरी टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी दादांना डिवचले आहे.(Rohit Pawar On Ajit Pawar)

रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटले की, भाजपने (BJP) अजित पवारांना लोकल नेता बनवले, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे. पण सध्या मात्र ते बारामतीत अडकले आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार पुढे म्हणाले की, शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोलले जाते आज आमचा ७० वर्षाचा य़ुवा नेता राज्यभर ४०
ते ५० सभा घेणार आहे. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहेत.

महाराष्ट्रभर अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपाची इच्छा आहे. अजित पवारांसंदर्भात राज्यात नकारात्मक वातावरण आहे.
त्यातच बारामतीत अजित पवारांचा उमेदवार तीन लाखांनी मागे दिसत आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल