Rohit Pawar On Ajit Pawar | काका-पुतण्यात जुंपली! आता रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, ”… तर अजिबात खपवून घेणार नाही”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Ajit Pawar | युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निघालेल्या युवा संघर्ष यात्रेकडे (Yuva Sangharsh Yatra) राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईन. परंतु, युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही, असा पलटवार पुतण्या आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar) यांच्यावर केला आहे.

काल कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार गटाचे रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) यांनाही लक्ष केले होते.

रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष? अजित पवार यांच्या या टीकेला रोहित पवारांनी एक्स हँडलवर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर (Rohit Pawar On Ajit Pawar) दिले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आदरणीय दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा ८०० किमीचा
पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत ५०० किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत, त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे.
भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न
मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल