युतीचे आजचे उद्योग पाहिले तर लहानपणीची सर्कस आठवते …!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी भाजप -शिवसेना युतीवर सडकून टीका केली आहे .  एवढेच नाही तर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची देखील आठवण करून दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की , कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे . भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत .  इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे , सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता “, पण आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठ्ठा भाऊ मानलं . काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली . पाच वर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणत मगरीचे अश्रू ढाळले , आणि आत्ता मुद्दे सोडून व्यक्तिगत टिका करु लागले .  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच सख्य आठवलं की काळीज , कोथळा , वाघनखे हे शब्द आजही आठवतात . असे असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

त्यांनी पुढे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की , युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते . पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा .  इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या शिवसेनेचा इतिहास आत्ता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल .

आता रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमधून केलेल्या टीकेला भाजप-शिवसेना युतीकडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us