गृहकलहाच्या चर्चांवरून रोहित पवार यांचा विरोधकांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात गृहकलह असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारांनी स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर एक संदेश लिहलेली पोस्ट अपलोड केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवर लिहले आहे की , ‘तुमच्या आमच्यांपैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो, त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती, तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा.

माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत ? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.

मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की, पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे कि आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे कि अजिबात कशाची काळजी करू नका,  आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या राजीनाम्याबाबत खुलासा केला. ‘यावेळी त्यांनी गृहकलहाच्या चर्चा फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केलीचर्चा शरद पवार यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांच्यावर होणाऱ्या गंभीर आरोपामुळे व्यथित होऊन मी राजीनामा दिला,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

Visit : Policenama.com