आदित्य ठाकरे आणि रोहित पवार, बघा कोण आहे अधिक श्रीमंत आणि किती आहे संपत्ती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर आता जवळपास सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या अर्जामध्ये उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केल्यानंतर याच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीदेखील कर्जत-जामखेड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला. त्यावेळी त्यांनी जाहीर केल्यानुसार त्यांची संपत्ती २७ कोटी इतकी आहे. शिवसेनेचे वरळी मतदारसंघातील उमेदवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील काल उमेदवारी अर्ज भरला ज्यात त्यांनी संपत्ती १६ कोटी रुपये इतकी जाहीर केली. याबाबतीत तुलना करता रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंना मागे पाडले आहे.

किती आहे रोहित पवार यांची संपत्ती :
व्यवसायाने उद्योजक असलेल्या रोहित पवार यांनी उमेदवारी अर्जात उल्लेख केल्यानुसार त्यांची एकूण संपत्ती २७ कोटी ४४ लाख २९ हजार २०० रुपये एवढी आहे. याशिवाय त्यांची एकूण स्थावर मालमत्ता २३ कोटी ९९ लाख २९ हजार २०० रुपये एवढी आहे. रोहित पवार यांच्या बँक खात्यात २,७५,३१,०३४ रुपये असून त्यांनी बॉन्ड, डिबेनचर्स आणि शेयर्समध्ये ९,६५,११,०७१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांनी पोस्ट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, आणि विम्यामध्ये ५७,०७,०२९ रुपये गुंतवले आहेत. याशिवाय रोहित पवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३ कोटी ४५ लाख रुपयांची संपत्ती आहे. अन्य गोष्टी पहिल्या तर रोहित पवार यांची गाडी ११ लाख ९२ हजार ३१९ रुपयांची आहे. सोने, चांदी, हिरे इत्यादी दागिन्यांमध्येही त्यांची गुंतवणूक आहे. रोहित पवार घड्याळाचे शौकीन असल्याचे दिसत असून त्यांच्याकडे अंदाजे २७,९१,९२८ रुपयांची ब्रँडेड घड्याळे आहेत.

isit : Policenama.com