Rohit Pawar | रोहित पवार यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला; म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshiyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिला आहे. रोहित पवार म्हणाले, पेन, पेपर घ्या आणि आजच्या आज राष्ट्रपतींकडे राजीनामा द्या. अशा शब्दात रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले आहे.

यावर पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, अनेक निवडणुकांमध्ये भाजप पिछाडीवर जात आहे. मुंबईसाठी भाजपने (BJP) एवढा मोठा पक्ष फोडला. केवळ चिन्हासाठी वेळ काढला जात आहे. भाजपची पिछेहाट होत असल्याने निवडणुक होत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुक एकत्र होण्याची शक्यता आहे. अशी टीका यावेळी बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ (Maharashtra Vision Forume) साठी रोहित पवार (Rohit Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र व्हिजन फोरमसाठी राज्यभरातून तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत १ लाख लोकांनी यात मतदान केले असून २४ हजार लोकांनी सल्ला दिला आहे. यातून व्हीजन डॉक्यूमेंट आम्ही सरकारला सादर करणार आहोत. फेब्रुवारी अखेर १० लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाईन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म असून सरकारने यावर काम करावे. असे यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना रोहित पवार म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
यांना देखील टोला लगावला. तसेच त्यांना यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या अजित पवार यांच्या पहाटेच्या
शपथविधीबाबत विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, ‘या विषयी खरं काय घडलं ते अजितदादा
(Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) साहेब सांगू शकतील.
बावनकुळे यांनी राजकीय मुद्दा मिळला म्हणून खुश राहू नये. बावनकुळे यांची वैचारिक बैठक कळते.
शरद पवारांवर बोलताना बावनकुळे यांनी पंतप्रधानांना विचारावं, मगच टीका करावी.’
अशा खोचक शब्दात रोहित पवार यांनी बावनकुळेंना सुनावले.

तसेच राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवर बोलताना रोहित पवार यांनी राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरले.
रोहित पवार म्हणाले की, राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाराष्ट्रासाठी परवानगी दिली गेली होती.
इतर राज्यांसाठी नाही. त्यामुळे ते प्रकल्प सुरू झाले नाही. दावोसला जाऊन जे करार केले ते जुन्याच कंपन्यांशी
केले गेले आहेत. असे देखील यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले.

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar appeal to the governor take pen and paper submit your resignation to the president today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुण्यात विचित्र अपघात! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू

Mohsin Shaikh Murder Case | संपूर्ण देशात गाजलेल्या पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, हिंदु राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह सर्वांची निर्दोष मुक्तता