Rohit Pawar | रोहित पवारांचा राम शिंदेंवर आरोप; ‘श्रेय घेता यावे यासाठी कर्जत जामखेड मधील जलसंधारणाची कामे ठप्प’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) येथून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे (MVA Government) पाठपुरावा करून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी जलसंधारणाची अनेक कामे मंजूर करून आणली. पण शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnavis Government) आल्यानंतर या कामाचे श्रेय घेता यावे यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde ) ही कामे रोखून ठेवली असल्याचा आरोप रोहित पवारांनी राम शिंदेंवर केला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे, तरी कर्जत जामखेड भागातील कामाचे श्रेय घेता यावे यासाठी आमदार राम शिंदे ही कामे रोखून धरण्यासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारत आहेत, असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

 

रोहित पवारांनी (Rohit Pawar) जलसंधारणाची अनेक कामे मंजुर केली होती. पण महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. या सरकारने सत्तेवर येताच आधीच्या सरकारने मंजूर केलेल्या बहुतेक कामांना स्थगिती दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २५ ऑक्टोबर रोजी सर्व कामावरील स्थगिती उठवणे अपेक्षित होते. पण अहमदनगर दक्षिणमधील फक्त कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके फक्त त्यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदार क्षेत्रातील कामे ठप्पच आहेत. यामध्ये २९ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठ्यात जवळपास १११० टीसीएम अतिरिक्त वाढ होणार असून आणि तब्बल ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याचा फायदा आसपासच्या २५ गावांतील हजारो शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे.

या कामाला स्थगिती दिली नसती तर आतापर्यंत यातील बरीच कामे पूर्ण झाली असती, असे सांगण्यात येत आहे.
जामखेडमध्ये राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे काम सुरु झाले होते.
ते जळगाव जिल्ह्यात हलविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे नुकतेच उघडकीस आले होते.
त्यानंतर आता जलसंधारण कामाच्या बाबीतीतही हा प्रकार होत असल्याचे समोर आले.

 

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar criticize ram shinde over karjat jamkhed development works

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना