Rohit Pawar | वेदांता-फॉक्सकॉन : आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेचे रोहित पवारांकडून समर्थन, म्हणाले – ते पुरावे…

पुणे : Rohit Pawar | दोन दिवसांपूर्वी तळेगाव येथे जनआक्रोश मोर्चात (Janaakshrosh Morcha) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta-Foxconn Project) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली होती. केवळ फॉक्सकॉनच नव्हे तर इतर कंपन्या सुद्धा महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर भाजपाशासित (BJP) राज्यात जात असल्याचे आदित्य यांनी म्हटले होते. या टीकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समर्थन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, वेदांताबाबत केवळ बोलत नाहीत, तर ते पुरावेही देत आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असे दिसते की, राज्यातील अनेक कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत.

रोहित पवार म्हणाले, योगायोग म्हणजे, डिसेंबर महिन्यात गुजरातची निवडणूक आहे, त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी सुरू आहेत की राजकारणासाठी, असा प्रश्न पडतो.

जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण आहे की,
दुसर्‍या राज्याच्या हिताचे राजकारण, हे बघितले पाहिजेत, खरे तर आदित्य ठाकरे हे लोकांत जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

तळेगावच्या जनआक्रोश मोर्चात आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आज तळेगावात येताना मनात दुख: होते.
आज महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government ) असते.
तर राज्यात वेदांताचा प्रकल्प काहीही करून आणलाच असता.
त्यामुळे आज इथे आक्रोश मोर्चाच्या जागी जल्लोष मोर्चा झाला असता.

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar reaction on aditya thackeray janaakshrosh morcha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव पार्कमधील पॉश सोसायटीतील घटना