Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान, हिंगोलीतील (Hingoli) सभेत सावरकरांचा मुद्दा काढला. यावेळी त्यांनी सावरकरांनी माफिनामे लिहिले आणि इंग्रजांकडून पेन्शन घेतली, असे म्हंटले. त्यामुळे राज्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आक्रमक झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, तर आगामी निवडणुका सोप्या जाऊ शकतात, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा उचलून धरला आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) फूट पडेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य तात्कालीन होते. त्यातून महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. पण, महाविकास आघाडीत फूट पडावी यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) जास्त ताकद लावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्यांच्या बाबतीत त्यांना राजकीय फायदा दिसला नाही. पण सावरकरांच्या बाबतीत दोनही पक्षात मतभेद होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. जर का महाविकास आघाडीत बिनसले आणि काँग्रेस वेगळी झाली, तर आगामी निवडणुका शिंदे-भाजपला सोप्या जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी या विषयाला आणि शिवसेनेला फूस दिली आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

सावरकर यांच्या विषयी माझा फारसा अभ्यास नाही. पण सर्वपक्षीय विचारवंतांनी एका व्यासपीठावर यावे आणि चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात राजकारण बाजूला ठेवून, राहुल गांधी यांनी दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखाण समजून घेतले पाहिजे. अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नाही, असेही पवार म्हणाले.

राज्यपालांनी शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले.
हर हर महादेवमध्ये शिवाजी महाराजांचा आणि बाजीप्रभू देशापांडेंचा खोटा इतिहास दाखवला गेला.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान केला, तेव्हा शांत असणारे मंडळ सध्या
सावरकरांच्या विषयावरुन रणकंदन माजवत आहे. काँग्रेस (INC) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांच्यात दरी निर्माण करत आहेत. महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी या मुद्याचा वापर केला
जात आहे, असे यावेळी राोहित पवार यांनी सांगितले.

Web Title :-  Rohit Pawar | rohit pawar reaction on rahul gandhi savarkar statement targets bjp shinde alliance marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई

Sandipan Bhumre | ‘कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे अंबादास दानवेंनी येऊन शोधून दाखवावे’ – संदिपान भुमरे

Buldhana Police | दारुच्या नशेत पोलिसाचे पेट्रोलिंग, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 3 वाहनांना धडक; बुलढाण्यातील विचित्र अपघात