Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar | दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Chinchwad and Kasba Constituencies Bypolls) जाहीर झाली आहे. यात भाजपकडून चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली नाही. महाराष्ट्रात एखाद्या आमदाराचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. मात्र कसबा पोटनिवडणुकीत तसे घडले नाही. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मत व्यक्त केले आहे.

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘स्वतः चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने टिळक कुटुंबाविरोधात उमेदवार दिला आहे. काही तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांच्या पक्षातील ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली होती. त्यामुळे आता त्यांना आणि मतदारांना खूश करण्यासाठी भाजपाने टिळक कुटुंबाला डावलून ओबीसी उमेदवाराला संधी दिली आहे. परंतु टिळक कुटुंबियांना संधी देण्याची जबाबदारी भाजपाची आहे.’ असे परखड मत यावेळी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मांडले.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी दिल्यामुळे,
वेगवेगळ्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. मात्र यावर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मी टिळक वाड्यात जाऊन शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल टिळक (Kunal Tilak) यांच्यासोबत चर्चा केली.
त्यानंतर आम्ही उमेदवारीबाबत निर्णय घेतला.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

तर, भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार कसबा विधानसभा मतदारसंघात
दाखल करत आहोत. असे काल काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते.

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar slams bjp over kasba bypoll election candidacy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस भाजपबरोबरच हिंदू महासंघाचा ‘हा’ उमेदवार लढणार निवडणुक