पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या मतदार संघात येऊ नये, यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना दहा फोन केले, असा दावा भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला होता. त्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी राम शिंदे आणि तानाजी सावंत यांना मैदानात येण्याचे आव्हान केले आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. “ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हे देखील माहीत नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनविण्याची भाषा करतो. अशा माणसाला मतदार संघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे यांनी पुड्या सोडणे बंद करावे. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि मैदानात या. तसेच यापुढे तुमच्या प्रचाराला त्यांना जरुर बोलवा.” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 29, 2022
सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टीका करत असतात.
येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीला आपल्याला हातात झाडू घेऊन हा मतदार संघ साफ करायचा आहे.
एका ठिकाणी जनशक्ती आहे, तर दुसऱ्या ठिकाणी धनशक्ती आहे. त्यांना वाटत आहे
की, धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ, असे तानाजी सावंत म्हणाले होते.
Web Title :- Rohit Pawar | rohit pawar slams tanaji sawant and ram shinde over statment about call
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप
T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला
Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी