Rohit Pawar | राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसात करणार – रोहित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदारांना आवाहन करताना पाहिजे तेवढा निधी देतो पण ईव्हीएमचे बटन कचाकच दाबा असे आवाहन केले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारकडे निधीचीच कमतरता असल्याचे समोर आले आहे. (Mahayuti Govt)

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पत्र शेअर करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच, याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा खुलासा करणार, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले हे कसे दाखवावे, या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाइल ज्यांच्या सहीने मंजूर होते, त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? असा सवाल करत सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची २० हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे, अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटी रुपयांची कर्जे काढली जातील.

हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही, मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असल्याचा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना