रोहित पवारांना धक्‍का : 4-5 दिवसातच ‘हे’ पंचायत समितीचे सभापती भाजपात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. अवघ्या काही दिवसांतच सभापती आव्हाड भाजपात गेल्याने रोहित पवार यांना मोठा झटका बसला आहे.

आज कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे सभापती आव्हाड यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घरवापसी केली. यापवेळी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेड नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे आदी उपस्थित होते.

२३ सप्टेंबर रोजी कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पाच दिवसातच ते पुन्हा भाजपात आल्याने रोहित पवार समर्थक अस्वस्थ झाले आहेत. या राजकीय हालचालीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत.

Visit : Policenama.com