फडणवीस ‘कोरोना’ झाल्याचं नाटक करताहेत असं म्हणणार्‍यांना रोहित पवारांनी दिलं एकदम ‘सडेतोड’ उत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना कोरोनाचा संसर्ग (coronavirus positive) झाला आहे. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. फडणवीस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यानेही त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही फडणवीसांसाठी एक ट्विट केलं होतं. मात्र, एका नेटकऱ्यांने फडणवीस यांना कोरोना वगैरे झाला नाही. बिहारमध्ये भाजप 100 टक्के हरणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फोडू नये म्हणून हे करोनाचे नाटक, बाकी काही नाही दादा, अशी टीका करणार ट्विट केलं होतं. त्यावरून रोहित पवारांनी त्याला चांगलंच झापलं आहे.

लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात फडणवीस राज्यभर दौरा करत होते. लॉकडाऊनच्या काळात ते कोव्हिड रुग्णालयांचीदेखील पाहणी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचाही पाहणी दौरा केला होता. त्याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत यांची माहिती दिली होती. एका युझरनं मात्र, फडणवीस हे करोना झाल्याचं नाटक करत आहेत, असं म्हटलं आहे. यावरून पवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दिल आहे.

फडणवीस यांच्याकडे जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कोणी खोट बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय बिहार निवडणुकीच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

You might also like