नवीन सरकार गुन्हेगारीवर कंट्रोल आणेल, स्व.आर.आर. पाटलांच्या मुलानं सांगितलं

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – भाजपा सरकारच्या काळात जी गुन्हेगारीची संख्या वाढली होती त्यावर महाविकास आघाडीचे सरकार नियंत्रण आणेल असा विश्वास माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यांचे चिरंजीव व युवा नेते रोहित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. करंजेपुल (ता. बारामती) येथील नितीन यादव यांच्या घरी पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले की, स्वर्गीय आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी नेहमीच राज्यातील महिला, जेष्ठ नागरीक व जनतेला पोलीसांकडुन सन्मानाची व न्यायाची वागणुक मिळेल यासाठी प्रयत्न केले व राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम केले. परंतु मध्यंतरी भाजप सरकारच्या काळात राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. वाढलेल्या या गुन्हेगारीला हे सरकार निश्चितच लगाम घालेन.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असुन त्यांना दिशा दाखवण्याचे काम या वयातही पवार साहेब करत असुन ते आमच्यासाठी आदर्शवत असल्याचे रोहित पाटील म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा मी चाहता असुन प्रशासनावर वचक व सर्वसामान्यांना त्वरित न्याय अजित पवार लगेच देतात असेही पाटील म्हणाले.

बारामतीचा विकासाचा पॅटर्न तासगांवात चालवणार- रोहित पाटील
आमदार रोहित पवार यांनी राबविलेली निवडणुकीतील यंत्रणेचा मी माझ्या मतदार संघातही प्रयोग राबवला त्याचा खुप चांगला फायदा झाल्याचा रोहित पाटील यांनी सांगुन येत्या काही दिवसांंत बारामतीचा विकासाचा पॅटर्न मतदार संघात राबविण्यासाठी बारामतीत येवुन मुक्काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like