Rohit R R Patil | दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला ‘या’ आजीकडून ‘ऑफर’ अन् ‘सल्ला’ (व्हिडिओ)

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit R R Patil | राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) असे अनेक नेते आहेत ते त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या सुसंस्कृत व सभ्यतेसाठी ओळखले जातात. त्या नेत्यांनी कायमस्वरुपी लोकांच्या मनात एक स्थान मिळवले आहे. त्यामध्ये एक नाव आहे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे. आर.आर. आबांचा मुलगा रोहित पाटील (Rohit R R Patil) देखील आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे.

 

शनिवारी रोहित पाटील हे सांगलीतील (Sangli) तासगावमध्ये असताना एका आजीने (grandmother) त्यांना हक्काने काही सूचना (advice) दिल्या, सोशल मीडियावर (social media) याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची आज दिवसभर चर्चेचा विषय ठरत आहे. दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजिव रोहित पाटील तासगाव मध्ये (Tasgaon) असताना त्यांना वाटेत दोन आजी भेटल्या. रोहित यांनी आजींची मायेने विचारपूस केली.

 

त्यावेळी आजीनेच रोहित यांना मायेने आणि हक्काने काही सल्ले दिले तर काही सूचना केल्या.
आजीबाईंच्या या हक्काने दिलेल्या सूचनांचा रोहित यांनी देखील प्रेमाने आणि आपुलकीने स्विकार करीत आशिर्वाद घेतले.
या प्रसंगाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देत ते म्हणतात की,
तासगाव येथे असताना या आज्जी भेटल्या. त्यांनी दिलेल हे प्रेम आणि ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थ करेन.

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी शेअर केला आहे.
रोहित तरुण नेते आहेत तसेच त्यांच्या विचार आणि वागणूकीवरही वडिलांची छाप दिसते. अशा प्रतिक्रिया अनेक नेटकरी देत आहेत.

 

Web Title :- Rohit R R Patil | former home minister of maharashtra r r patils son rohit patil also received invaluable advice from this grandmother

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,399 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Slab Collapses | पुण्याच्या बालेवाडीतील ‘अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन’ साईटवर स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी, साईराज बिल्डकॉनच्या तिघांवर FIR

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग