कोलकता नाइट रायडर्सविरूध्द विस्फोटक खेळी करत रोहित शर्मानं केले ‘विक्रम’, बनवले ‘हे’ 5 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – काल मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल 2020 सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या स्फोटक डावामुळे मुंबई इंडियन्सने कोलकाताला 196 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तराच्या रूपात कोलकाता नाईट रायडर्स निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 146 धावा करु शकली.

क्विंटन डी कॉकसोबत मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करणारा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2020 मध्ये पहिला मोठा डाव खेळला होता. रोहित शर्माने केवळ 54 चेंडूत तीन चौकार आणि 4 षटकार आणि 80 धावा केल्या. या खेळामुळे रोहित शर्माने 5 मोठे विक्रम मोडले आहेत.

1. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा चौथा आणि दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माच्या अगोदर ख्रिस गेल, एमएस धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांनी आयपीएलमध्ये 200 हून अधिक षटकार मारले आहेत.

2. रोहित शर्माने आयपीएलमधील एकाच संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आतापर्यंत 904 धावा केल्या आहेत.

3. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबई इंडियन्सचा 20 वा विजय आहे, जो सर्वोच्च आहे.

4. आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅचचा अ‍ॅवॉर्ड मिळवणाऱ्या रोहित शर्माने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. रोहित शर्माने एकूण 18 वेळा मॅन ऑफ द मॅचचा अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे.

5. आयपीएलमध्ये रोहित शर्माने काल 38 वे अर्धशतक झळकावले आणि या प्रकरणात तो आता एबी डिव्हिलियर्सला मागे सोडून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.