IND VS SA : ‘हिटमॅन’ रोहित शर्माची डबल सेंचुरी ‘हुकली’, होता होता राहिली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात करत शानदार  दीडशतक झळकावले आहे. वर्ल्डकप स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने पाच शतके झळकावून सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला निवड समितीने कसोटी संघात देखील सलामीला खेळण्याची संधी दिली. त्याने हि संधी सार्थ ठरवत  शानदार शतकी खेळी केली.

कालच्या  नाबाद 105 धावांवरून पुढे खेळताना आज रोहित शर्मा याने सलामीवीर मयांक अगरवाल याच्या साथीने शानदार सुरुवात करत आफ्रिकेच्या गोलंदाजाची धुलाई केली. रोहित शर्मा याच्यापाठोपाठ मयांक अगरवाल याने देखील शानदार शतक झळकावले. दोघांनी संघाला तीनशे धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर केशव महाराज याच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा 176 धावांवर यष्टिचित झाला.

त्यामुळे त्याचे कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावण्याचे स्वप्न अपुरे राहिले. त्याने आपल्या  244 चेंडूत केलेल्या 176 धावांच्या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकार लगावले. दरम्यान, भारतीय संघाने 88 षटकांत 1 बाद 324 धावा केल्या असून चेतेश्वर पुजारा आणि मयांक अगरवाल सध्या मैदानावर आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरात भारतीय संघ किती मोठा धावांचा डोंगर उभा करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या