ICC World Cup २०१९ : भारत-पाक सामन्यात विक्रमांचाही धो-धो ‘पाऊस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत करत आपली या स्पर्धेतील चांगली कामगिरी कायम राखली. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान समोर ३३६ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ फक्त २१२ धावाच करू शकला.

भारताकडून रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी करत १४४ धावा केल्या. या स्पर्धेत भारताने सलग सातवेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघ ७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. य सामन्यात सलग सात वेळा पाकिस्तानला पराभूत करण्याच्या विक्रमासह अनेक विक्रम केले आहेत.

कोण कोणते आहेत हे विक्रम

१) कोहलीच्या सर्वात जलद ११ हजार धावा

पाकविरुद्ध काल ७७ धावांची खेळी करत विराटनं एकदिवसीय कारकिर्दीतील ११ हजार धावा पूर्ण केल्या. अवघ्या २२२ डावांमध्ये ही कामगिरी करताना विराट सर्वाधिक वेगानं ११ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरनं २७६ डावांमध्ये ११ हजारांचा टप्पा ओलांडला होता. विराटनं त्याच्यापेक्षा ५४ डाव कमी खेळून हा टप्पा गाठला.

२) विजय शंकर पहिला खेळाडू

वर्ल्डकप सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनलं आहे, तसेच ४४ वर्षांच्या इतिहासात तो फक्त तिसरा गोलंदाज बनला आहे.

३) पाकविरुद्ध सर्वाधिक धावा

या सामन्यात रोहित शर्मा याने १४४ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचबरोबर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

४) सलग सातवा विजय
वर्ल्डकप मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग सातवा विजय मिळवत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आजपर्यंत झालेल्या एकही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.

५) सर्वाधिक फरकाने विजय
काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. हा पराभव आतापर्यंतचा सर्वात जास्त फरकाने झालेला पराभव आहे.

६) शोएब मलिक दुसरा खेळाडू
शोएब मलिक हा भारताविरुद्ध शून्यावर आऊट होणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

७) रोहित शर्मा दुसराच फलंदाज
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक करणारा रोहित शर्मा हा केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. त्याआधी विराट कोहली याने २०१५ मध्ये शतक केले होते.

८)हसन अलीचा विक्रम
या सामन्यात हसन अलीने एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. त्यानं ९ षटकात तब्बल ८४ धावा दिल्या. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाची ही सर्वात खराब कामगिरी आहे.

आरोग्य विषयक वृत्त- 

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

लठ्ठ मुलांसाठी भाटिया रुग्णालयात ओपीडी सुरू

राज्यात ‘MBBS’च्या जागा वाढणार