Rohit Sharma | विराट कोहलीनंतर भारताला कसोटी कर्णधार मिळाला; ‘या’ धुरंधराकडे सोपवली जबाबदारी!

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Rohit Sharma | विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघाचा कर्धणारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर जाणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून होतं. अखेर बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधापरदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या (Sri Lanka) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) जाहीर झाला आहे. टी-20 आणि कसोटी साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित (Rohit Sharma) आता वनडे आणि टी-20 पाठोपाठ कसोटी संघाचाही कर्णधार झाला आहे.

जाहीर झालेल्या संघांमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. टी- 20 मध्ये कोहलीला जरी विश्रांती (Rest) देण्यात आली असली तरी कोहली कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका कोहलीसाठी खास असणार आहे. मोहाली येथे कसोटी सामना कोहलीचा 100 वा सामना असणार आहे.

https://www.instagram.com/p/CaKEmbkvPTc/?utm_source=ig_web_copy_link

पहिला टी-20 सामना 24 फेब्रुवारीला लखनऊ येथे तर दुसरा 26 फेब्रुवारीला धर्मशाला तर तिसरा आणि शेवटचा सामना हा 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथेच होणार आहे. कसोटी मालिका 4 मार्चला सुरू होणार आहे, यातील दुसरा कसोटी सामना 12 मार्चला असणार आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ- (T-20 Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- (Test Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत,
केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

Web Title : Rohit Sharma | india team for sri lanka t20 test series rohit sharma
captain chetan sharma press conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा