Rohit Sharma | रोहित शर्माची आज पहिली परीक्षा, ‘या’ 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार ‘हिटमॅन’

जयपूर : वृत्तसंस्था – Rohit Sharma | भारताच्या टी-20 क्रिकेटमध्ये बुधवारपासून नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आज भारत ( India )आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमधील (T – 20 Series) पहिला सामना जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंग स्टेडियममध्ये (Sawai Mansingh Stadium) खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सध्या टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. या स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीपण गाठता आली नव्हती. यानंतर टीम निवडीवर आणि टीमच्या संतुलनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

 

पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड यांना टीम तयार करायला फार वेळ मिळणार नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासूनच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना तयारी सुरू करावी लागणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले. यामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या विराट कोहली,
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर राहुल चहर,
हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना डच्चू देण्यात आला आहे.
तसेच आयपीएलमध्ये (IPL) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

या खेळाडूंसह मैदानात उतरणार हिटमॅन रोहित?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल ( उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज

 

Web Title :- Rohit Sharma | india vs new zealand first t20 rohit sharma rahul dravid era to start in india this could be playing xi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतील 7000 पेक्षा जास्त गावांना दिली जाणार 4G मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी

WhatsApp Desktop App | आले WhatsApp चे नवीन अ‍ॅप, विना फोन डेस्कटॉपवर वापरा WhatsApp, जाणून घ्या कसे?

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे