‘रोहित उत्तम कर्णधार, मी त्याच्यावर जळतो’ : कुमार संगकारा

पोलिसनामा ऑनलाईन – भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा गेले काही दिवस विविध विषयांमुळे चर्चेत आहे. रोहित आपल्या मुलीसोबत खेळतानाचा व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. त्याआधी भारताचे तीन सलामीवीर एकत्र एका लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसले. मयंक अग्रवालच्या लाईव्ह चॅट शो मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे सहभागी झाले. त्यावेळीही रोहितबद्दल चाहत्यांना अनेक मजेशीर गोष्टी समजल्या आहेत. दुसरीकडे श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा याने रोहितवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

रोहितला मैदानावर खेळताना बघायला मला खूप आवडते. तो एक उत्तर क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाची शैली अप्रतिम आहे. त्याच्या याच शैलीवर काहीवेळा मला इर्ष्या वाटते. रोहित जेव्हा क्रिकेट खेळत असतो तेव्हा त्याची फटकेबाजी ओढूनताणून आणल्यासारखी नसते. त्याने मारलेले फटके अत्यंत रूबाबदार वाटतात आणि त्याची खेळी समतोल असते. त्याच्याकडे नेतृत्वकौशल्यही आहे. IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी तो अगदी शोभून दिसतो, कारण माझ्या मते तो एक उत्तम कर्णधार आहे, अशा भावना कुमार संगकाराने व्यक्त केल्या. भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची नावे पाठविली जातात.