गौतम गंभीरचा पुन्हा एकदा कॅप्टन कोहलीवर निशाणा, म्हणाला…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर गंभीरने कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता गंभीरने कोहलीवर निशाणा साधला आहे. खेळाडू आणि फलंदाज म्हणून कोहली सर्वश्रेष्ठ आहेच मात्र कर्णधार म्हणून रोहित शर्माने त्याच्यापुढे आव्हान उभे केले असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.

आयपीएलमध्येही कोहलीच्या आरसीबीलाला गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले. त्यावरून गंभीरने कोहलीवर टीका केली होती. ”कोहली इतका नशीबवान खेळाडू दुसरा कोणी नसेल. सातत्याने अपयशी ठरूनही आरसीबीने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेले नाही,” असेदेखील त्याने त्यावेळी म्हटले होते. पुढे त्याने म्हटले आहे कि, रोहितच्या नावावर चार आयपीएल जेतेपद आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर तीन, परंतु कोहलीच्या नावावर एकही नाही. रोहितने कर्णधार म्हणून स्वत:ला सिध्द केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ कोहलीच्या अनुपस्थितीतील पर्याय म्हणून पाहू नका. कोहलीपेक्षा रोहित हा कर्णधारपदाच्या बाबतीत उजवा ठरला आहे, असेदेखील कोहली याने म्हटले आहे.

दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कोहलीला चार नंबरवर खेळवण्याच्या विधानावर देखील गौतम गंभीरने भाष्य केलं आहे. कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. फलंदाजीचा क्रम बदलून खेळावर परिणाम करून घेऊ नये. के.एल.राहुल हा चौथ्या नंबरसाठी योग्य असल्याचे त्याने म्हटले.