Rohit Sharma Records | अफलातून ‘हिटमॅन’ ! रोहित शर्मानं केली विराट अन् बाबरची बरोबरी, एकाच मॅचमध्ये केलं ‘हे’ 6 मोठे रेकॉर्ड

रांची : वृत्तसंस्था – Rohit Sharma Records | रोहित शर्मानं (Rohit Sharma Records) टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून जोरदार सुरुवात केली आहे. टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) टी20 मालिकेत (India vs New Zealand T20 Series 2021) 2-0 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. या दोन्ही सामन्यांत रोहितने अनुक्रमे 48 आणि 55 रन केले आहेत. या मॅचमध्ये रोहितनं 6 मोठे रेकॉर्ड केले आहेत.

 

1) 29 वे अर्धशतक
रोहितनं शुक्रवारी टी20 इंटरनॅशनलमधील 29 वे अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहलीनंसुद्धा (Virat Kohli) हि कामगिरी 29 वेळा केली आहे. रोहित शर्माने कालच्या सामन्यात त्याच्याशी बरोबरी केली आहे. रोहित आतपर्यंत 4 शतक आणि 25 अर्धशतक झळकावली आहेत. तर विराटला आजवर टी20 इंटरनॅशनलमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. (Rohit Sharma Records)

 

2) राहुलसोबत 5 वी शतकी भागिदारी
रोहित शर्मानं शुक्रवारच्या मॅचमध्ये केएल राहुल सोबत पहिल्या विकेटसाठी 117 करून शतकी भागिदारी केली. रोहित-राहुल जोडीची टी20 इंटरनॅशनलमधील ही 5 वी शतकी भागिदारी आहे. त्यांनी पहिल्या विकेटसाठी सर्वात जास्त शतकी भागिदारी करणाऱ्या बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या जोडीशी बरोबरी केली आहे.

 

3) 450 सिक्स पूर्ण
रोहित शर्मानं कालच्या सामन्यात (IND vs NZ) 5 सिक्स लगावले. त्यामुळे त्याच्या नावावर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 454 सिक्स झाले आहेत. यामुळे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 450 सिक्स लगावणारा रोहित हा पहिला भारतीय बनला आहे. या अगोदर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (Chris Gayle) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी ही कामगिरी केली आहे. (Rohit Sharma Records)

4) 50 रन झाल्यानंतर 25 वा विजय
टी20 इंटरनॅशनलमध्ये 50 रनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रोहितनं टीम इंडियाला 25 वा विजय मिळवून दिला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला ही कामगिरी आजवर करता आलेली नाही. विराट कोहली 20 विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

5) 13 वी शतकी भागिदारी
रोहित शर्मानं टी20 इंटरनॅशनलमध्ये 13 वेळा शतकी भागीदारी केली आहे.
यामध्ये त्याने केएल राहुलसोबत (KL Rahul) 5 वेळा, शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) 4 वेळा,
विराट कोहलीसोबत (Virat Kohli) 3 वेळा आणि सुरेश रैनासोबत (Suresh Raina) 1 वेळा शतकी भागिदारी केली आहे.

 

6) सर्वात कमी मॅचमध्ये 10 विजय
रोहित शर्मानं भारतामध्ये कॅप्टन म्हणून सर्वात कमी वेळा 10 विजय मिळवले आहेत.
रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 11 टी20 मध्ये 10 विजय मिळवले आहेत.
विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) 10 विजय मिळवण्यासाठी 15 मॅचपर्यंत वाट बघावी लागली होती.

 

Web Title :- Rohit Sharma Records | ind vs nz rohit sharma made 6 big records in a single t20i equals virat kohli and babar azam Rohit Sharma Records in marathi policenama news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर

Body Polishing Tips | नॅचरल प्रॉडक्टने घरातच करा बॉडी पॉलिशिंग, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 25 वर्षीय विवाहितेची ‘कौमार्य’ चाचणी