Rohit Sharma | टीम इंडिया हरली पण रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Sharma | टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) ची दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलँडबरोबरचे (Netherlands) पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला (Team India) कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) आपल्या नावावर केला आहे.

रोहितने श्रीलंकेच्या या खेळाडूला टाकले मागे?

रोहितचा टी 20 वर्ल्ड कपमधला हा 36 वा सामना आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड रोहितच्या (Rohit Sharma) नावावर झाला आहे. हा रेकॉर्ड करताना त्याने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला (Tillakaratne Dilshan) मागे टाकले आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 35 सामने खेळला आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

रोहित आणि दिलशाननंतर टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे तीन खेळाडू आहेत.
पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी, वेस्ट इंडिजचा ड्वेयन ब्राव्हो आणि शोएब मलिक यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये
प्रत्येकी 34 सामने खेळले आहेत. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने 33 सामने खेळले आहेत.

Web Title :- Rohit Sharma | rohit sharma become the most capped players in the t20 world cup 2022 edge past tillakaratne dilshan ind vs sa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा