Rohit Sharma | नागपूर कसोटीमध्ये रोहितचे विक्रमी शतक! अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला तर जगातील चौथा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने मॅचच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे कसोटीमधील पहिले शतक ठरले आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीमधील हे नववे शतक ठरले. या शतकासह रोहितने (Rohit Sharma) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

काय आहे तो विक्रम?
क्रिकेटच्या तिनही फॉर्मेटमध्ये वनडे, टी-20 आणि कसोटीत शतक करणारा रोहित शर्मा हा जगातील चौथा कर्णधार ठरला आहे. तर भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या अगोदर अशी कामगिरी तिलकरत्ने दिलशान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केली आहे. रोहितने 2017 साली प्रथम वनडे आणि टी-20 मध्ये नेतृत्व केले होते. तेव्हाच वनडे मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने 208 धावा केल्या होत्या. तर टी-20 मध्ये 118 धावा केल्या होत्या. यानंतर आता नागपूर कसोटीमध्ये त्याने कर्णधार म्हणून शतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या कसोटीमध्ये रोहित शर्माने 120 धावा केल्या. यामध्ये 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा भारताच्या फिरकी गोलंदाजसमोर निभाव लागला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावात गार झाला.
ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर स्मिथने 37, एलेक्स कॅरीने 36 आणि हँडसकॉम्बने 31 धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. या सामन्यात जडेजाने 5,
अश्विनने 3 तर सिराज आणि शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
यानंतर या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही खास झाली नाही.
के. एल राहुल लवकर बाद झाला. यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) आर. आश्विन,
विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या सहाय्य्यने टीमचा डाव सावरला. सध्या रवींद्र जडेजा (45) आणि
अक्षर पटेल (3) धावांवर खेळत आहेत. सध्या टीम इंडियाच्या 250 धावा झाल्या आहेत.

Web Title :- Rohit Sharma | rohit sharma hundred against in australia 1st test at nagpur