Rohit Sharma ला ‘या’ मुलाची बॉलिंग Action आवडल्याने त्याने थेट…. (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी 20 वर्ल्ड (T-20 World Cup) कपची तयारी करत आहे. यावेळी सराव करत असताना रोहित शर्माला (Rohit Sharma) तिथे क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलाने प्रभावित केलं. यानंतर रोहितने (Rohit Sharma) या मुलाला थेट नेटमध्ये बोलावल व त्याला गोलंदाजी करायला लावली. BCCI आपल्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. द्रुर्शिल चौहान (Drurshil Chauhan) असे त्या मुलाचे नाव आहे. तो 11 वर्षांचा आहे. रोहितला या मुलाच्या गोलंदाजीने प्रभावित केले.

 

टीम इंडियाची या स्पर्धेची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. या आधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन सराव सामने खेळले. दोन्ही सामने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळले. एका मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.

 

रोहितने नेट्समध्ये दिली संधी
टीम इंडिया आज सरावासाठी जेव्हा मैदानात दाखल झाली. त्यावेळी तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती.
यात एक लहान मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज होता.
रोहितने (Rohit Sharma) जेव्हा या छोट्या मुलाची गोलंदाजी पाहिली, तेव्हा तो त्याच्या या गोलंदाजीने प्रभावित झाला.
यानंतर रोहितने  मुलाला बोलावलं व आपल्यासोबत नेट्समध्ये घेऊन गेला व त्याला गोलंदाजी करायला लावली.

त्या मुलाने टीम इंडियाचा ड्रेसिंग रुम पाहिला
रोहित नेटमध्ये या मुलाची गोलंदाजी खेळला. त्या मुलाने टीम इंडियाचा ड्रेसिंग रुम (Dressing Room) पाहिला.
अन्य खेळाडूंशी चर्चा केली. त्यानंतर रोहितने या मुलाला आपला ऑटोग्राफही (Autograph) दिला.

 

 

Web Title :- Rohit Sharma | rohit sharma impress with 11 year old bowler call him on the nets t20 world cup 2022