Rohit Sharma | रोहित शर्मा वनडे संघाचा नवा कर्णधार; टी-20 संघाचीही कमान सांभाळणार; विराट कोहलीला डच्चू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rohit Sharma | भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) ऐवजी आता हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय मालिकेत (ODI match) संघाचे कर्णधारपद देण्यात येणार आहे. टी-20 नंतर रोहित शर्माला वनडे संघाचा कॅप्टन (Captain) बनवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतला आहे. तसेच, वनडे कर्णधारपद (ODI captaincy) देण्यासोबतच रोहितला आता कसोटी संघाचे उपकर्णधारपद देखील दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयकडून (BCCI) संकेत मिळाल्यानंतर विराट कोहलीने टी-20 विश्वचषकाचे कॅप्टनपद सोडले होते, परंतु, तो स्वत: वनडेचे कर्णधारपद (Captain) सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (Tours of South Africa) जाणाऱ्या भारतीय संघाची (Indian team) घोषणा लांबणीवर पडली. तर, भारतीय संघाला या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. (Rohit Sharma) या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे हा दौरा एक आठवडा उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे मालिकेतील टी-२० सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

 

Web Title :- Rohit Sharma | rohit sharma indian cricket team odi t20 captain after virat kohli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटल्याचं उघड ! पुणे पोलिसांनी आरोग्य संचालनालयातूनच घेतलं सह संचालकाला ताब्यात, प्रचंड खळबळ

Army Helicopter Crash | तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भारतावर शोककळा ! ‘शौर्य’ चक्राने सन्मानित कॅप्टन वरुण सिंह बचावले, हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘ही’ योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या कोणाला होणार फायदा