‘हिटमॅन’ रोहित शर्माचा क्रिकेटमधून निवृत्तीबाबत गौप्यस्फोट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्ध होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माला विश्रांती दिली असली तरी त्याचे लक्ष क्रिकेटवरच आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यामुळे दोन दौऱ्यासाठी रोहित शर्मा तयारी करत आहे. दरम्यान, रोहित शर्माने या दौऱ्याआगोदर निवृत्तीवर गौप्यस्फोट केला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माने सांगितले की, न्यूझीलंडमध्ये क्रिकेट खेळणे सोपे नाही. यापूर्वी झालेला दौरा आम्ही 0-1 ने गमावला होता. पण आता आपल्याकडे गोलंदाजांची चांगली टीम आहे. तसेच नवीन चेंडूने कोठेही फलंदाजी करणे सोपे नाही. अर्थात भारताबाहेर परिस्थिती अधिक कठीण आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत चेंडू ज्या प्रकारे फिरत होता, ते मला भारतात दिसत नाही. विशेषत: पुणे कसोटी सामन्यात चेंडू बराच स्विंग करीत असल्याचेही रोहित शर्माने सांगितले.

निवृत्तीबाबत गौप्यस्फोट
मुलाखती दरम्यान रोहित शर्माला निवृतीबाबत विचारले असता, मी अद्याप याबद्दल विचार केला नाही. माझ्याकडे जिंकण्यासाठी वर्ल्ड कप आहेत. वर्ल्ड कप जिंकूनच निवृत्त होईल, असे रोहित शर्माने सांगितले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. ज्यामध्ये प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जाते. इंग्लंडमधील 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा प्रवास उपांत्य फेरीत संपला. पण टी-20 मधील त्यांचा प्रवास जिंकल्यानंतरच थांबेल अशी रोहितची इच्छा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/