‘हिटमॅन’ रोहितनं शेअर केला ‘गब्बर’ धवनचा झोपेत बडबडणारा ‘व्हिडीओ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतील क्रिकेट रोहित शर्माने सोशल मिडियावर क्रिकेटर शिखर धवनचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हिडिओ पाहून चाहते देखील मजा घेत आहेत. रोहितने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत लिहिले की, नाही, तो माझ्याशी बोलत नाहीये आणि आता त्याचे वय ही असे राहिले नाही की त्याचा कोणी काल्पनिक मित्र असेल. एवढे खूश का होत आहेत शिखर धवन ?

यानंतर शिखरने लगेचच सांगितले की, तो शायरीची प्रॅक्टिस करत होता आणि व्हिडिओवर कमेंट केली की, जेव्हा हा व्हिडिओ काढण्यात आला तेव्हा मी शायरीची प्रॅक्टिस करत होतो. किती मनापासून गुणगुणत होतो शायरी, जर अभ्यासात एवढे लक्ष दिले असते तर.

रोहित त्याच्या मुलीला खेळणे घेत होता, तेव्हा त्याचा व्हिडिओ धवनने शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिले की, भेटा आमच्या टीमवर प्रेम करणारे आणि काळजी घेणारे वडील रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाला.

धवनने रोहित शर्माला विचारले की त्याने त्यांच्या मुलीला काय घेतले. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की मला जे काही चांगले वाटले ते मी घेतले. माझे कुटूंबीय बंगळुरुला येत आहेत. तर विचार केला की मुलीला खेळणे घेऊन देईल. तिला आवडतील. रोहितने लिहिले की त्याच्या मुलीला समायराला खिळणे खूप आवडतात.

Visit – policenama.com 

You might also like