पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी त्याचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. सलामीवीर रोहित शर्माने देखील भन्नाट फोटो शेअर करीत चहलला शुभेच्छा दिल्या आहेत.
Bhai congrats on your engagement. Best wishes @yuzi_chahal pic.twitter.com/HWwx6glcGB
— Rohit Sharma (@ImRo45) August 8, 2020
माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइल ‘हटके’ शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आताचा सलामीवीर रोहित शर्मादेखील मागे राहिला नाही. त्याने एक भन्नाट असा फोटो शेअर केला. फोटोमध्ये एक वयस्कर माणूस आणि एक तरूण दोघेही जर्सी घालून उभे आहेत. महत्त्वाचे त्या तरूण माणसापेक्षाही तो वयस्क माणूस जास्त उत्साही दिसत असून हात वर करून फोटोसाठी पोझ देत आहे. चहल म्हातारा झाल्यावर असाच दिसेल आणि तरूणांसोबत 2050 साली चहल असाच फोटो काढेल, असे रोहितने म्हटले आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याला साखरपुड्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.