Rohit Sharma World Record | हिटमॅन रोहितने नागपूर T-20 मध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Sharma World Record | नागपूरमध्ये (Nagpur) ऑस्ट्रेलिया (India Vs Australia T 20 Match) विरुद्ध दुसरा T- 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय मिळवला आहे. पावसामुळे हा सामना 8-8 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे आव्हान ठेवले होते. यामध्ये एका बाजूने विकेट पडत असताना रोहितने (Rohit Sharma) एका बाजूने खिंड लढवत टीमच्या विजयासाठी मोलाची भूमिका पार पाडली. या सामन्यात रोहितने नाबाद 46 केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याबरोबर हिटमॅन रोहितने आंतरराष्ट्रीय T- 20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Rohit Sharma World Record)

हिटमॅन बनला सिक्सर किंग

आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सिक्सरच्या बाबतीत फलंदाज मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मामध्ये रेस सुरु आहे. पण रोहित आता दोन्ही बाबतीत मार्टिन गप्टिलपेक्षा (Martin Guptill) पुढे गेला आहे. नागपूरच्या सामन्यात रोहितनं जोश हेजलवूडला (Josh Hazlewood) पहिलाच सिक्स ठोकला तेव्हा त्याने सर्वाधिक सिक्सरचा गप्टिलचा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात रोहितने एकूण 4 सिक्स लगावले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय T- 20 मध्ये त्याच्या नावावर आता सर्वाधिक 176 सिक्स जमा आहेत. तर गप्टिल 172 सिक्ससह रोहितच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 5 सिक्सर किंग

रोहित शर्मा – 176, भारत

मार्टिन गप्टिल – 172, न्यूझीलंड

ख्रिस गेल – 124, वेस्ट इंडिज

ऑईन मॉर्गन – 120, इंग्लंड

अरॉन फिंच – 119, ऑस्ट्रेलिया

Web Title :- Rohit Sharma World Record | indian captain rohit sharma break record of most sixes in t20i

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. |सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : शिंदे फडणवीस सरकारने असा निर्णय घेतल्यास पुन्हा आंदोलन, अण्णा हजारे यांचा इशारा

BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स…