‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट बदलली ! शुक्रवारी नव्हे तर ‘या’ दिवशी रिलीज होणार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड सिनेमा सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूर्यवंशी हा सिनेमा रिलीज डेटच्या 3 दिवस आधीच थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. अक्षय कुमारनं स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा सिनेमा 27 मार्च रोजी रिलीज होणार होता. आता हा सिनेमा 24 मार्च म्हणजेच 3 दिवस आधीच रिलीज केला जाणार आहे. चाहत्यांना याबाबत माहिती देताना आपल्या पोस्टमध्ये अक्षय कुमार म्हणतो, “अपराधासाठी आता वेळ नाही. कारण आता येत आहेत पोलीस. सूर्यवंशी आता वर्ल्ड वाईड 24 मार्च रोजी रिलीज होणार आहे.” रिलीज डेट सांगातनाच त्यानं सूर्यवंशीचा हॅगटॅगही वापरला आहे. तसं पाहिलं तर सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की, सिनेमा आता 3 दिवस आधीच रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारनं सिनेमाची रिलीज डेट बदलल्याचं सांगताना एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओ अक्षय कुमारसोबत रणवीर सिंगदेखील दिसत आहे. खास बात म्हणजे अजय देवगणदेखील नवीन रिलीज डेट प्रमोट करताना दिसत आहे. सध्या अक्षय कुमारची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.