Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार महिला पोलिसाची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : Rohit Shetty | सिंघमच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, तर आता रोहित शेट्टीच्या सिंघम 3 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच ‘सर्कस’ या चित्रपटांमधील ‘करंट लगा’ गाण्याच्या लॉन्चिंगदरम्यान रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’बाबत भाष्य केले. रोहित शेट्टीने स्वतः खुलासा केल्याने चाहते आता या चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत, तर लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ही सुरुवात होणार आहे.

‘करंट लगा’ गाण्याच्या लॉन्चिंगवेळी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणदेखील हजर होते. यावेळी रोहित शेट्टीने स्वतः सिंघममध्ये लेडी सिंघमची भूमिका कोण साकारणार याची माहिती दिली.

रोहित म्हणाला, “तुम्हाला कुठून ना कुठून तर याची माहिती मिळणारच आहे. त्यापेक्षा मी स्वतः याची माहिती देतो.
तुम्ही प्रत्येक वेळी मला विचारत होता की लेडीज सिंघम कधी येणार? तर ‘सिंघम 3’ मध्ये लेडी सिंघमची भूमिका
अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारणार आहे, तर 2023 मध्ये आम्ही या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात
करणार आहोत. रोहितच्या या वक्तव्यानंतर रणवीर लगेच म्हणाला “‘सिंघम 3’ माझ्याशिवाय बनूच शकणार नाही”.
यावर या चित्रपटात पुन्हा एकदा रणवीर आणि दीपिका एकत्र दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title :- Rohit Shetty | singhan again movie director rohit shetty announce film lead actress deepika padukone play lady cop see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना