रोहतक : वृत्तसंस्था – जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राज्यात घातपात करण्याची धमकी दिली आहे. मुंबईसह 11 रेल्वे स्थानक आणि 6 मंदिरं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाकिस्तानातून हरियाणामधील रोहतक रेल्वे जंक्शनच्या अधिक्षकांना मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये राज्यातील 6 महत्त्वाची मंदिरे स्फोटकाने उडवून देण्याची धमकी दिली आहे. हे पत्र ‘मसूद अमहद’ याच्या नावाने असून त्याने स्वत:ला जम्मू आणि काश्मीरचा एरिया कमांडर असल्याचे म्हटले आहे.
रोहतक रेल्वे जंक्शनच्या अधीक्षकांना पत्र मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुरक्षा संस्था त्याचा आणखी तपास करत आहेत. ८ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हे स्फोट घडवून आणण्यात येतील असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुंबईसहा महत्त्वाच्या रेल्वे स्थानक आणि राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
या पत्रामध्ये मुंबई, रोहतक जंक्शन, रेवाडी, हिसार, कुरुक्षेत्र, बंगळुरू, चेन्नई, जयपूर, भोपाल, कोटा आणि इटारसी या रेल्वे स्थानकांची नावे आहेत. तर राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यामधील महत्त्वाची मंदिरे उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रानंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर संबंधीत विभागांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स
- मधासोबत मिसळून खा मनुके, शरीराला होतील ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या
- वजन कमी करायचे आहे का? डायटिंगचा कंटाळा येतो? मग करा ‘हे’ उपाय
- पुरुषांनी अशा प्रकारे खावे ‘जवस’, रहाल सदैव तरुण, जाणून घ्या उपाय
- गरोदर महिलांनी अवश्य खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्यप्रकारे वाढ
- चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय
- जाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, परिस्थितीनुसार प्या पाणी