शहीद जवान मित्राच्या बहिणीच्या लग्नात उपस्थिती लावत कमांडोंनी केली तिची आगळी वेगळी ‘पाठवणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवान शहिद झाल्यावर त्याच्या मागे राहिलेल्या कुंटूंबाची वाताहत होताना आपण पाहिले आहे, परंतू २ वर्षापुर्वी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले रोहतासमधील अशोक चक्र विजेते वायुसेनेचे गरुड कमांडो ज्योति प्रकाश निराला याच्या बहिणीच्या लग्नात एक अजब प्रकार घडला, निराला यांच्या कमांडो मित्रांनी निराला यांच्या बहिणीसाठी तिच्या लग्नात असे काही केले की त्यातून समाजापुढे एक आदर्श निर्माण झाला. निराला यांच्या बहिणीला सासरी पाठवताना त्यांनी तीच्या पायाखाली आपले हात ठेवत तीच्यासाठी आपल्या हातांच्या पाठवणी मार्ग बनवला आणि बहिणीची सासरी पाठवणी केली. शहिदाच्या बहिणीसाठी त्यांनी जे काही केले तो समाजासाठी एक आदर्श निर्माण केला.

पाऊल जमीनीवर टाकू दिले नाही
हे लग्न काही सामान्य लग्न नव्हतं, तर यात आपण जे फोटो पाहत आहात ते अशोक चक्र प्रदान करण्यात आलेल्या गरुड कमांडो शहीद जवान ज्योति प्रकाश निराला याची बहिण आहेत. या लग्नात शहीद जवानाचे अनेक मित्र सहभागी झाले होते. त्यांनी शहीद मित्राच्या बहिणीसाठी भावाचे नाते निभावत त्यांनी बहिणीच्या पाठवणी वेळी नवरीची पावले जमीनीवर पडू दिली नाहीत. जेथे जेथे नवरीने पावली टाकली तेथे तेथे शहिद जवानाच्या मित्रांनी तीच्या पावलांखाली आपले हात ठेवले परंतू नवरीचे पाऊल जमीनीवर पडून दिले नाही.


भावाची कमी भासली नाही
शहीद जवानाची बहीण शशिकलाने सांगितले की तीला यामुळे भावाची कमी भासली नाही, इतकी गौरवपुर्ण पाठवणी होत असल्याने नवरा मुलगा सुजीत कुमार देखील भावूक झाले. या २० पेक्षा आधिक कमांडो मित्रांनी शहिद मित्राच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावून भावाची भूमिका निभावली.

आरोग्य विषयक वृत्त 

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे