…जेव्हा अधिकाऱ्यांच्या समोरच चुकतो पोलीस महासंचालकांचा (DGP) ‘निशाणा’ !

रोहतास : वृत्तसंस्था – बिहार पोलीस दलाचे प्रमुख म्हणजे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. यावेळीही त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे, ज्यामध्ये ते लागोपाठ गोळ्या मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बिहारच्या डिहरीमधील आहे, जेथे डीजीपी फायरिंग रेंजमध्ये गोळ्या मारताना दिसत आहेत.

डीजीपींनी इन्सास रायफलने केली फायरिंग
डीजीपींनी इन्सास रायफलने एक, दो, तीन नाही तर एकुण पाच गोळ्या मारल्या. परंतु, एकही गोळी निशाण्यावर लागली नाही. या महिन्याच्या 10 फेब्रुवारीपासून रोहतासच्या डेहरीमध्ये ऑल इंडिया पोलीस शुटींग कॉम्पिटीशन होणार आहे. या कॉम्पिटीशनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वत: डीजीपी गुप्तेश्वर पांडेय सेंटरवर पोहचले होते. त्यांनी फायरिंग रेंजचे निरीक्षण केले आणि नंतर स्वत: रायफलने निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

पोलीस प्रमुखांचा स्कोअर किती
डीजीपींच्या 5 पैकी 3 गोळ्या निशाण्यावर लागल्या परंतु, दोन गोळ्यांचा निशाणा चुकला. यावेळी डीजीपींनी लॉग रेंज आणि शॉर्ट रेंज दोन्हीमध्ये फायरिंग केली. पहली, तिसरी आणि चौथी गोळी निशाण्यावर लागली, तर दूसरी आणि पाचवी गोळी निशाण्यावर लागली नाही. यावेळी रोहतासचे एसपी सत्यवीर सिंह यांच्यासह बिहार पोलिसांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिहरीच्या या शुटींग रेंजवर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 30 पेक्षा अधिक पोलीस टीम सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील सर्व राज्यांसह सीआरपीएफच्या टीमसुद्धा सहभागी होणार आहेत. यादरम्यान अनेक स्पर्धा होणार आहेत. आयजी मुख्यालय कमल किशोर यांनी सांगितले की, बिहारमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या पोलीस स्पर्धा होत आहेत. या सहा दिवसांच्या स्पर्धांच्या दरम्यान पोलिसांचे लक्ष डेहरीवर राहणार आहे. या तयारीचा आढावा घेतानाच डीजीपींना स्वत: फायरिंग केली.