100 वर्षाचे झाले तरी आजोबांची ‘वकिली’ जोरात, कोर्टात बाजू मांडताना विरोधकांची उडते ‘भंबेरी’

पोलीसनामा ऑनलाइन : आधुनिकता आणि धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या जाणावत असतात परंतू बिहारमध्ये एक वकील आहेत. जे 100 वर्षाच्या वयात आज देखील तगड्या पद्धतीने वकीली करतात. ते रोज न्यायालयात जातात आणि न्यायाधीशांसमोर आपला पक्ष मांडतात. आणि असा काही पक्ष मांडतात की विरुद्ध पक्षाच्या वकीलाला घामच फुटेल. 13 नोव्हेंबरला 100 वर्ष वय पूर्ण करणारे हरिनारायण सिंह कदाचित देशातील पहिलेच अधिवक्ता आहेत.

13 नोव्हेंबरला साजरा केला 100 वा वाढदिवस –
रोहतास जिल्ह्यातील तिलई गावात राहणारे हरिनारायण सिंह सासराम सिविल कोर्टात प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ अधिवक्ता आहेत. ते 13 नोव्हेंबरला 100 वर्षांचे झाले. परंतू अजूनही ते अजूनही न्यायालयात जातात. ऐवढेच नाही तर न्यायालयात आपल्या पक्षांची बाजू देखील खणखणीत आवाजात मांडतात. त्यांची या वयातील ऊर्जा पाहून तरुण अधिवत्ता देखील थक्क होतात. हरिनारायण यांनी आपल्या नातवांबरोबर आपला शंभरावा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते अचानक चर्चेत आले.

67 वर्षांपासून करतात वकीली –
हरिनारायण सिंह यांचा जन्म 1919 मध्ये शाहाबाद जिल्ह्यातील तिलई गावात झाला होता. ते शेतकरी कुटूंबातील आहेत. 1948 मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कोलकता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि बिहारला आले. त्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पटना शाखेत नोंदणी केली आणि 1952 पासून प्रॅक्टिसला सुरुवात केली. विशेष म्हणजे ते 67 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी शेकडो खटले लढले आहेत.

कायदेशीर प्रक्रियाचे मोठा अनुभव –
1950 पासून भारतीय संविधान निर्माणापासून ते आतापर्यंत त्यांनी अनेक कायदेशीर बदल पाहिले आहेत. हरिनारायण म्हणाले की त्यांचे वरिष्ठ रामनरेश सिंह होते जे त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते. परंतू या दरम्यान सीनियरला अत्यंत इज्जत दिली जात असे. देशातील मोठंमोठे नेते वकीलच होते. याच कारणाने त्यांनी 10 वी नंतरच ठरवले होते की ते वकीली करणार. कारण महात्मा गांधींपासून, बाबासाहेब आंबेडकरांपासून मोठ मोठे कायदेतज्ज्ञ देशात उच्च स्थानी होते.

नियमित येतात न्यायलयात –
आज देखील हरिनारायण रोज न्यायालयात येतात. आज अनेक अधिवक्ता आहेत जे त्यांच्याकडून कायद्याची माहिती घेत आहे. त्यांचे अनेक ज्युनियर आज देशातील विविध न्यायालयात आपली सेवा देत आहेत. ते म्हणाले की मी माझ्या वरिष्ठांकडून बरेच काही शिकलो.

आदर्श जीवन शैली –
हरिनारायण आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देतात. मसालेदार जेवण घेत नाहीत. वेळेत जेवतात. सकाळ दुपार फिरणे त्यांची सवय आहे. रात्री लवकर जेवून झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. त्यांची दिनचार्या आहे. सकाळी पूजाआर्चा करणे, गो सेवा करणे. ऐवढेच नाही तर शेतीची निगराणी देखील ते करतात. सासाराम शहरात त्याचे घर आहे परंतू ते जास्त वेळ गावात राहणे पसंत करतात.

संयुक्त कुटूंबातून मिळते ताकद –
त्यांचे संयुक्त कुटूंब आहे. कुटूंबात एकूण 40 पेक्षा जास्त सदस्य आहेत. तरुण पीढी शहरात राहणे पसंत करतात. परंतू आज देखील ते गावात राहतात. संयुक्त कुटूंबाचे प्रमुख असल्याने नातेवाईकांमध्ये ते जबाबादार आहेत. ते म्हणतात की जबाबदारी व्यक्तीला मजबूत बनवते.

राजकारणात आहे मुलगा –
जेडीयूचे वरिष्ठ नेता आणि माजी विधान परिषद कृष्ण कुमार सिंह हरिनारायण यांचे पुत्र आहेत. राजकारणात कृष्ण कुमार सिंह यांचा चांगला प्रभाव आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या घरी ये जा करतात. परंतू हरिनारायण सिंह राजकारणात मध्यस्थी करत नाहीत. ते म्हणतात की मी वकील आहे परंतू जेवढा वेळ घरी असेल तेव्हा मी शेतकरी आहे.

नातवडांचे आदर्श आहेत हरिनारायण सिंह –
हरिनारायण नातू चुन्नू सिंह, अभिषेक उर्फ सोनू सिंह म्हणतात की त्याचे आजोबा त्यांचे प्रेरणास्त्रो आहेत. त्यांच्या आशर्वादाने कुटूंबात आनंद आहे. त्याचे आजोबा त्यांना मुलांसारखे संभाळतात. परंतू चूक केल्यानंतर ओरडतात देखील. त्यांची जीवनशैली वेगळी आहे.

Visit :  Policenama.com