विरोधकांचा प्रत्येक ‘शब्द’ आमच्यासाठी महत्वाचा, अनेक मुद्यांवर चर्चा होणार : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे पहिले अधिवेशनही सुरु झाले आहे. त्यापूर्वी मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांची ताकद लोकशाहीत महत्त्वाची असते, विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्वाचा आहे, असं म्हणत विरोधकांना मान दिला. मात्र त्यासोबतच त्यांना सभागृह चालविण्यासाठी कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी दिले.

लोकांच्या अपेक्षा, स्वप्न घेऊन आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या या १७ व्या लोकसभेत सर्वात जास्त आहे. अनेक अडचणींवर मात करत बहुमतामध्ये पुन्हा एकदा जनतेने भाजपाला सत्तेत आणलं आहे. देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी लोकांनी आम्हाला दिली, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना विरोधकांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन मोदींनी यावेळी केले.

येणाऱ्या ५ वर्षामध्ये सदनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार कायम करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची बिकट अवस्था, बेरोजगारी, दुष्काळ, जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन अधिक चांगले होऊ शकते, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

दरम्यान, संसदीय अधिवेशन २६ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्व संधेला मोदींनी बैठक बोलवली होती. यात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे वाहतूक शाखेतील ‘ढेरपोटे’ पोलिसांना ड्यूटी नाही ; उपायुक्तांचा आदेश

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला